12 वी अर्थशास्त्र धडा ५ – बाजाराचे प्रकार स्वाध्याय प्रश्नोत्तरे (Important Q&A ) Maharashtra State Board
विध्यार्थ्यांनो, आज आपण 12 वी अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा धडा — “बाजाराचे प्रकार (Types of Market)” या विषयाचे स्वाध्याय प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. परीक्षेत वारंवार विचारले जाणारे सर्व महत्त्वाचे प्रश्न, सविस्तर आणि सोप्या भाषेत इथे दिले आहेत. पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, एकाधिकार, अल्पाधिकार, एकाधिकारात्मक स्पर्धा या सर्व बाजार रचनेशी संबंधित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात एकाच ठिकाणी मिळतील. हा धडा वारंवार ५ ते ८ मार्क्स मध्ये विचारला जात असल्यामुळे, ही प्रश्नोत्तरे अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. चला तर मग, स्वाध्यायातील सर्व महत्त्वाचे प्रश्न समजून घेऊया! 12 वी अर्थशास्त्र धडा ५ – बाजाराचे प्रकार स्वाध्याय प्रश्नोत्तरे प्रश्न १ . थोडक्यात उत्तरे लिहा . १ . अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा . उत्तर : अल्पाधिकार बाजारात फारच कमी उत्पादक किंवा विक्रेते असतात आणि या मर्यादित संख्येतील उत्पादकांचा संपूर्ण बाजारावर मोठा प्रभाव असतो. एका उत्पादकाच्या निर्णयाचा थेट परिणाम इतर उत्पादकांच्या वागणुकीवर होतो, त्यामुळे हे बाजाररूप परस्परावलंबी अस...