१२ वी अर्थशास्त्र – chapter ३ (अ ) : मागणीचे विश्लेषण

मित्रांनो, मागच्या ब्लॉग मध्ये आपण १२ अर्थशास्त्र chapter २ उपयोगिता विश्लेषण पहिले , आज आपण मागणीचे विश्लेषण (12th Economics Demand Analysis) पाहणार आहोत . मागणी ही अर्थशास्त्रातील अतिशय महत्वाची संकल्पना आहे. ग्राहक कोणत्या किंमतीला, किती प्रमाणात व कधी वस्तू खरेदी करतो, यावरच बाजारातील किंमती ठरतात. म्हणूनच या प्रकरणात आपण मागणीचे अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार आणि पुढील अभ्यास करणार आहोत. १२ वी अर्थशास्त्र – अध्याय ३ : मागणीचे विश्लेषण मागणीचा नियम (Law of Demand) मांडणी (Statement): इतर घटक स्थिर धरले असता (ceteris paribus), एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर तिची मागणी वाढते आणि किंमत वाढली तर मागणी घटते. सोप्या भाषेत: किंमत कमी → मागणी जास्त किंमत जास्त → मागणी कमी उदाहरण: साखरेची किंमत ₹60 प्रति किलो असताना मागणी 4 किलो आहे. किंमत ₹40 झाली तर मागणी 8 किलोपर्यंत जाते. आरेख (Demand Curve): मागणी पत्रकाचे स्पष्टीकरण : वरील वैयक्तिक मागणी पत्रकात क्ष वस्तू म्हणजेच साखरेची विविध किमतींना केलेली खरेदी दर्शवली आहे . यावरून असे लक्षात येते कि अधिक कि...